“हा भाजपाच्या ढोंगावरचा बुरखा फाटला आहे” !! अमित शाह यांच्या बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या उद्दाम उल्लेखाबद्दल उद्धव ठाकरे यांचे टिकाश्र !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ डिसेंबर २४ गुरुवार
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती व त्यानंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना टोला लगावला यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली यावेळी भाजपा नावाचा उर्मट पक्ष महापुरुषांचा अपमान करत आहे असे म्हटले आहे.अमित शाह आणि भाजपा यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कडाडून टीका केली आहे तसेच रामदास आठवले,एकनाथ शिंदे,अजित पवार,नितीश कुमार,चंद्राबाबू या सगळ्यांना हा अपमान मान्य आहे का ? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.भाजपाचे नेते गेली अडीच ते तीन वर्षे आणि त्याआधीपासून काही उर्मट नेते महाराष्ट्राचा,महापुरुषांचा,महाराष्ट्रातील दैवतांचा अपमान करत आहेत तो अपमान सहनशीलतेच्या पुढे गेला आहे.जेव्हा कोश्यारी नावाचे एक गृहस्थ महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बसवले गेले होते तेव्हा महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता.त्यांच्या लग्नाच्या वयावरुन त्यांनी विचित्र टिपण्णी केली होती.छत्रपती शिवरायांचा अपमानाही कोश्यारींनी केला होता त्यावेळी भाजपाने त्यांना माफी मागायला सांगितली नाही.त्यांना पदावरुन दूर केले नाही.मध्यंतरीच्या काळात छत्रपती शिवरायांचा पुतळा घाईने बसवण्यात आला व तो पुतळा आठ महिन्यांत पडला त्यानंतर काय घडले सगळ्यांना माहीत आहे.महाराष्ट्र गांडुळांचा प्रदेश आहे असे भाजपा नेत्यांना वाटते आहे.महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात आहे.आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली त्या देशाच्या महामानवाचा अपमान केला.आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन झाली आहे असा हिणकस आणि उद्दाम उल्लेख अमित शाह यांनी केला.हा भाजपाच्या ढोंगावरचा बुरखा फाटला आहे अस उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
भाजपाचे ढोंग आता समोर आले आहे-उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी मुंबईत तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती व या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपाचे ढोंग आता समोर आले असून त्यांचा बुरखा फाटला आहे.हिंदुत्व म्हणजे मुँह मे राम आणि बगल में छुरी असे यांचे हिंदुत्व आहे.यांना महाराष्ट्र संपवायचा आहे.आपल्याखेरीज दुसरे कुणीही देशात जन्माला आलाच नाही असे त्यांना दाखवून द्यायचे आहे.नेहरुंचे नाव घेत टीका करत होते आता हे बाबासाहेब आंबेडकरांवरही बोलू लागले.एवढी यांची हिंमत वाढली आहे.आता मला भाजपाला पाठिंबा देणारे जे नितीश कुमार आहेत,चंद्राबाबू आहेत ते काय करत आहेत हे विचारायचे आहे तसेच रामदास आठवले काय करत आहेत ? भाजपासह जे आमचे मिंधे गेले आहेत त्यांना आणि अजित पवारांना बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का ? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
अमित शाह यांच्यासारखा उद्दाम माणूस !!
संघाने आता खुलासा केला पाहिजे की अमित शाह यांच्याकडून हे बोल तुम्ही बोलून घेतले आहे.अदाणीचे नाव घेतले की आभाळ कोसळावे तसा भाजपा कोसळतो.जो आरोप करतो त्यावर भाजपाचे लोक लगेच टीका करु लागतात.आम्ही जे लोकसभेच्या वेळी म्हणत होतो की यांना संविधान बदलायचे आहे आता दुर्दैव असे आहे की लोकसभेत चर्चा ही संविधानावरच चर्चा सुरु आहे.ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले त्यांच्याबाबत अमित शाह यांच्यासारखा माणूस इतका तुच्छतेने कसा काय बोलू शकतो ? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले पाहिजे.त्यांनी एकतर अमित शाह यांच्यावर कारवाई करावी किंवा मग मोदींनी सत्ता सोडावी अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.
‘काँग्रेसनेही बाबासाहेबांचा अपमान केला’ विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, “दुसऱ्याने शेण खाल्ले…”
काँग्रेसबाबत प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
यानंतर उद्धव ठाकरेंना काँग्रेसनेही बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी भूमिका घेतली होती असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले,“दुसऱ्याने शेण खाल्ले म्हणून तुम्ही खात आहात का ? अमित शाह यांनी काय केले त्यावर बोला.अमित शाह उद्दामपणे वागत आहे ही बाब संतापजनक आहे.” असे उद्धव ठाकरे यांनी