मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार

आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळणे म्हणजे नशिबच समजायचे असते.आपल्या सुख-दुःखात नेहमी साथ देणारा जोडीदार मिळाला की आयुष्य समाधानाने जगता येते व हे नात कायम जपण्यासाठी लग्नसोहळा पार पाडला जातो व यात नवरा-बायकोचे नात खूप पवित्र मानले जाते.एकमेकांबद्दल प्रेम,तितकाच आदर आणि विश्वास असणारे नात हे असते.पण काहीजण लग्न आणि प्रेमाच्या नावाखाली आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत.एकाचवेळी दोन लग्न करून संसार देखील करू लागले आहेत व याचा मनस्ताप कुठेना कुठे संसारात त्या तिघांनाही भोगावा लागत असेल पण अनेकदा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे प्रकार केले जातात.सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एका महिलेने दोन सख्ख्या भावांशी लग्न केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.यात एक विवाहित महिला दोन पतींसह संसार करत असल्याच दिसत आहे.यादरम्यान एका व्यक्तीने त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना काही प्रश्न विचारले.मुलाखतदाराने आधी विचारले की,हे दोघे कोण आहेत.यावर महिला म्हणली “एक पहिला पती आहे तर एक दुसरा पती आहे आणि दोघ सख्खे भाऊ आहेत”.महिलेने दोन्ही नवऱ्यांसाठी दोन मंगळसूत्र परिधान केले होते.ती म्हणाली,“एका नवऱ्यासाठी एक मंगळसूत्र आहे तर दुसऱ्या नवऱ्यासाठी दुसरे.दोन पती आहेत तर दोघांसाठी दोन मगळसूत्र घालणे गरजेचे आहे.” यावर मुलाखतदाराने विचारले की तुम्ही हे सगळे मॅनेज कसे करता ? “आम्ही कुठेही जातांना एकत्रच जातो.एकत्र राहतो,एकत्र खातो,एकत्र झोपतो.” असे सदरील महिलेने सांगितले.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला हा व्हिडीओ @digitalbharat563 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून एक पत्नी के दो दो पती असे  कॅप्शन याला देण्यात आले आहे तर या व्हिडीओला तब्बल २.४ मिलियन व्हूयज आले आहेत.तर एक पत्नी आणि दोन पतींचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने कमेंट करत लिहिले, “घोर कलयुग आहे.” तर दुसऱ्याने “आता हेच बघायचे बाकी राहिले होते” अशी कमेंट केली तर एकजण कमेंट करत म्हणाला की, “यांना तुरूंगात टाका”.