पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार

सध्या लग्नसमारंभ सुरू आहे.सोशल मीडियावर लग्न साखरपुड्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.विविध विधींचे,डान्स गाण्याचे व्हिडीओ दरदिवशी चर्चेत येत आहे.सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये नवरी चक्क मजेशीर शपथ घेताना दिसत आहे.तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवरी नेमकी कोणती शपथ घेते ? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडीओ एका साखरपुड्याच्या कार्यक्रमातील आहे.या व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरदेव नवरी,काही नातेवाईक स्टेजवर उभे असलेले दिसेल.नवरदेव आणि नवरीच्या मध्ये एक अँकर उभा आहे जो नवरीला शपथ घेण्यास सांगतो.या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरी हात पुढे करून अँकरच्या सांगण्यावरून शपथ घेते.

नवरी अँकरच्या पाठोपाठ म्हणते,“लग्नानंतर माझे जर कधी चुकून भांडण झाले तर मी कधीच दर्शनला सॉरी म्हणणार नाही तर दरवेळेस त्यांनाच सॉरी म्हणायला लावणार.लग्नानंतर दर्शन कितीही कामात असले तरी मी त्यांना पाणी पुरी खायला घेऊन जाणारच आणि ज्यावेळी मला शॉपिंगला जायचे असेल त्यावेळेस दर्शन झोपेतून उठायच्या आधी मी त्यांच्या खिशातून एटीएम कार्ड काढणार आणि दुपारी शॉपिंगला जाऊन येणार”.सदरील नवरीची ही शपथ ऐकून स्टेजवर तिच्या शेजारी उभा असलेला नवरदेव व इतर नातेवाईक हसताना दिसतात.सध्या हा नवरीचा मजेशीर शपथविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” साखरपुडा समारंभ.. ..इंगळे (सरदेशमुख)- महाकाळ परिवार,पुणे”

या अँकरचे नाव सुशील सूर्यवंशी असून ते सोशल मीडियावर अशा प्रकारचे भन्नाट व्हिडीओ शेअर करतात त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.