मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२१ फेब्रुवारी २५ शुक्रवार

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलतांना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेल्याचे त्यांनी म्हटले व त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आले तसेच एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद होणार नाही ना ? याबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना बसच्या प्रवासात ५० टक्के सवलत बंद होणार का ? यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्टीकरण दिले असून ‘महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही’, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहि‍णींना देण्यात आलेली ५० टक्के सवलत बंद होणार नाही तसेच जेष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही” असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.