यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील साकळी येथील हाजी अयुब खान गफूर खान यांची नात तसेच अहसान फ्रुट कंपनीचे असलम खान व सामाजिक कार्यकर्ता वसीम खान अयुब खान यांची पुतणी अयमन फातिमा अमजद खान (वय ७ वर्ष) हिने पवित्र रमजान महिन्यानिमित्त आतापर्यंत पाच रोजे (उपवास) पूर्ण करून अल्लाहकडे आशीर्वाद मागितला आहे.सदरहू अयमन फातिमा अमजद खान या लहानशा बालिकेने केलेल्या रोजांचे परिसरात कौतुक केले जात आहे.
दरम्यान वाढत्या उन्हाच्या काळाची पर्वा न करता तिने पवित्र रमजानचे रोजे ठेवल्या त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.अयमन फातिमा हि साकळी येथील हाजी अयुब खान गफूर खान यांची नात तसेच अहसान फ्रुट कंपनीचे असलम खान व सामाजिक कार्यकर्ता वसीम खान अयुब खान यांची पुतणी आहे.