Just another WordPress site

यावल येथे शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला बालाजी रथोत्सव व खंडोबा महाराज यात्रा उत्साहात साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ एप्रिल २५ मंगळवार

येथील शहरातील शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या श्री बालाजी रथोत्सव व खंडोबा महाराज यात्रोत्सवानिमित्ताने उत्साहाच्या वातावरणात बारागाडया ओढण्यात आल्या.यावेळी नदी पात्रात एक दिवसीय यात्रोत्सवात श्री.हनुमान जयंती निमित्ताने हरीता सरीता नदीपात्रात श्री व्यास महाराज यांच्या मंदिरासमोर पारंपारिक पध्दतीने विधिवत पुजा करीत रथ ओढण्यात आला.प्रसंगी श्री बालाजी रथाचे यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

दरम्यान यावल शहरात हनुमान जंयतीच्या निमित्ताने श्री व्यास महाराजांच्या मंदीरासमोरील नदीपात्रात शंभर वर्षापेक्षाही अधिक काळाची परंपरा असलेल्या बालाजी महाराज रथ सायंकाळच्या सुमारास विधिवत पद्धतीने पुजा अर्चना करीत ओढण्यात आला.त्याचबरोबर हरीता (हडकाई) नदी पात्रात चोपडा रोड ते डांगपुरा मस्जिदपर्यंत खांडोबा महाराज यांच्या बारागाडया ओढण्यात आल्या.सदर रथोत्सव व यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी फैजपुर विभागाचे प्रभारी पोलीस उपअधिक्षक कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे,पोलीस उपनिरिक्षक राजेन्द्र साळुंके,पोलीस उपनिरिक्षक पिराजी वाघमोडे,पोलीस उपनिरिक्षक रशीदा तडवी,पोलीस उपनिरिक्षक अस्लम खान,सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी बंदोबस्त चोख राखला.

Leave A Reply

Your email address will not be published.