Just another WordPress site

भालोद दुध उत्पादक सोसायटी पंचवार्षीक निवडणुक आमदारांच्या प्रयत्नातून बिनविरोध !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२६ मे २५ सोमवार

तालुक्यातील भालोद येथील दूध उत्पादक सहकारी सोसायटीची सन २०२५ ते २०३० पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाच्या माघारीच्या अंतिम दिवशी व्यवस्थापन समितीचे सदस्य संख्या तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्याने सदर निवडणूक बिनविरोध करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वासुदेव शालिग्राम पाटील यांनी जाहीर केले.सदर निवडणूक आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून बिनविरोध झाली असल्याची चर्चा चर्चिली जात आहे.

दरम्यान यावल-रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे त्यांनी स्वागत केले आहे.नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे आहे.यात शरद माधव महाजन,गिरीश डालू इंगळे,धनराज प्रल्हाद चौधरी,किरण गोविंदा इंगळे,जयंत शशिकांत परतणे,मितेश राजेंद्र इंगळे,अशोक लक्ष्मण चौधरी,निळकंठ इच्छाराम नेहते,राजेंद्र गणेश इंगळे,हेमचंद्र मुरलीधर वारके,वैभव जीवन महाजन,अशोक देवराम यांची तसेच सर्वसाधारण गटातून चौधरी खेमचंद्र योगराज तर इतर मागासवर्गीय महिला राखीव मधून बारी भारती संजय,चौधरी विद्या नितीन तसेच अनुसूचित जातीमधून भालेराव भीमराव भास्कर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.सदर प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी हेमंत अरुण जावळे व दूध संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले व नवनिर्वाचित व्यवस्थापकीय मंडळाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे व सर्वांनी स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.