यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ आक्टोबर २५ शनिवार
राज्यात २०२५-२६मध्ये होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रीक निवडणुकीचे वारे वाहू लागले असून तालुक्यातील हिंगोणा सावखेडा गटातून युनुस अब्दुल तडवी यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत येत आहे.हिंगोणा सावखेडा गटातून जिल्हा परिषद हे आरक्षण एस.टी.राखीव आरक्षित झाले असुन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागील २० वर्ष समाजसेवेचे काम करणारे सुशिक्षित आदिवासी कुटुंबातील तरुण समाज सेवक म्हणून ओळख असलेले युनूस तडवी यांना जिल्हा परिषद उमेदवारी मिळेल अशी चर्चा परिसरात होत आहे.
दरम्यान युनुस तडवी यांनी ग्रामपंचायत पत्नी खल्लोबाई तडवी यांच्या सहाय्याने विविध विकासकामे केलेली आहेत.ग्रामपंचायत परसाडेच्या माध्यमातुन महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे एकमेव पुरस्कार व बक्षीस युनूस तडवी यांना जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी त्याच्या हस्ते सन्मानित करून पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.