यावल नगरपालिका निवडणुक विश्लेषण : प्रभाग ७ मध्ये महाविकास आघाडी उबाठाच्या उमेदवार रेखाताई धोबी यांना वाढता पाठींबा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० नोव्हेंबर २५ गुरुवार
येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या येथील यावल नगरपालीका निवडणूक २०२५ च्या सार्वत्रीक निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार रेखाताई संतोष धोबी या यावल शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधुन शिवसेना (उबाठा) तर्फे निवडणूक लढवीत आहेत.
दरम्यान रेखाताई धोबी या येथील एकनिष्ठ कार्यकर्ते संतोष धोबी यांच्या पत्नी असून त्या यावल नगरपालीका निवडणूक २०२५ च्या सार्वत्रीक निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधुन शिवसेना (उबाठा) तर्फे निवडणूक लढवीत आहेत.सदरहू रेखाताई धोबी यांनी घरोघरी जावुन आपल्या प्रचारास सुरूवात केली असुन त्यांच्या प्रचारास प्रभागातील सर्वसामान्य नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शरद कोळी यांनी यावल नगरपालीकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मित्रपक्षांचे उमेदवार व नगराध्यक्ष हे विजयी होतील असा विश्वास शिवसेना उबाठाचे यावल तालुका प्रमुख शरद कोळी यांनी व्यक्त केला आहे.