यावल नगरपालिका निवडणूक विश्लेषण : “शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास” असलेल्या छाया पाटील यांना नागरीकांची वाढती साथ !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० नोव्हेंबर २५ गुरुवार
संपुर्ण राज्यात येणाऱ्या २ डिसेंबर २०२५ रोजी होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रीक निवडणुकीला सुरूवात झाली असून यावल नगर परिषदेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.सदरहू सदर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सदर निवडणूक प्रचारादरम्यान माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व समाजसेविका छाया पाटील हे पाटील दाम्पत्य शहरातील नागरीकांच्या घरोघरी जावुन प्रचार करीत असून त्यांच्या प्रचाराला शहरातील नागरीकांकडून मोठा प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.यावल नगरपालीकेच्या माध्यमातुन “शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास” याच मार्गाने आपण शहराला मुलभुत सुविधा,स्वच्छ,पारदर्शक प्रशासन तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणार आहे. दरम्यान आपल्या विश्वासाच्या बळाशिवाय आम्हाला शहराचा विकास करता येणार नसल्याचे सौ छायाताई पाटील हे प्रत्येक मतदाराला सांगत असुन प्रचाराच्या माध्यमातुन त्यांच्या जनसंपर्क कार्यक्रमास शहरातील नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.