Just another WordPress site

यावल नगरपालिका निवडणुक विश्लेषण : प्रभाग दोन मधील भाजपा उमेदवार रूबाब तडवी व वंदना फेगडे यांच्या प्रचारास चांगला प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ नोव्हेंबर २५ शुक्रवार

येथील नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रचाराला वेग आला आहे.प्रत्येक उमेदवार निवडून येण्याकरिता आपआपल्या परीने प्रयत्न करून मतदारांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

दरम्यान यावल नगरपालीकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील अनुसुचित जमाती (एसटी) च्या राखीव असलेल्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रूबाब महमंद तडवी व याच प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार वंदना भुषण फेगडे हे निवडणूक लढवीत आहेत.यात वंदना फेगडे यांनी रावेर मतदार संघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मुलभुत सुविधा स्वच्छा,रस्ते मुबलक स्वच्छ पाणी अशा विविध विकासचे संकल्प समोर ठेवुन शहरातील आपल्या प्रभागात समर्थाकांच्या सोबत आपला होम टू होम निवडणुक प्रचार सुरू केला असुन त्यांच्या प्रचारास मतदार नागरीकांची मोठी साथ मिळत असतांना दिसत आहे.तसेच असाच शहरवासीयांचा प्रतिसाद रुबाब तडवी यांना मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाचे दोघही अधिकृत उमेदवार रूबाब महमंद तडवी व वंदना भुषण फेगडे हे प्रभाग क्रमांक दोन मधुन प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास पक्षाचे यावल शहराध्यक्ष राहूल बारी यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.