Just another WordPress site

यावल नगरपालीका निवडणुक विश्लेषण : आमदार अमोल जावळे एक्शन मोड पर !! प्रचारा दरम्यान कॉर्नर बैठकीतुन मतदारांशी साधला संवाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३० नोव्हेंबर २५ रविवार

येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या यावल नगरपालीकेच्या प्रचार रणधुमाळी ही अंतीम टप्प्यात आली असून येथील नगरपालिकेच्या २३ प्रभागात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमदार अमोल जावळे हे एक्शन मोड पर आले असुन पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्षच्या उमेदवार रोहीणी फेगडे यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांनी कॉर्नर बैठकी घेत नागरीकांच्या समस्या जाणुन घेत शहरात आपल्या माध्यमातुन होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती देत आहेत.

दरम्यान आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाजन गल्ली परिसरात मतदार बंधु भगीनीशी संवाद साधला व यावल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार रोहिणी उमेश फेगडे व प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेवक पदाच्या उमेदवार देवयानी धिरज महाजन व नगरसेवक पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर फेगडे यांच्यासह यावल शहरातील विविध प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा आणी त्यांना आपल्या सेवेची संधी द्या असे प्रतिपादन कॉर्नर बैठकीत रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांनी केले.या कॉर्नर बैठकीला त्यांच्या सोबत अरविंद देशमुख,माजी नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद जिवराम महाजन,पक्षाचे यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी,मसाकाचे माजी संचालक नरेन्द्र नारखेडे,प्रमोद नेमाडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व प्रभागातील नागरीक मोठया संख्येत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.