यावल येथे आज प्रभाग क्रमांक ८ ब निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सागर चौधरींच्या प्रचारार्थ रॅली !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ डिसेंबर २५ गुरुवार
शहरातील नगर पालिका सार्वत्रीक निवडणुकीतील दि.२० डिसेंबर २०२५ शनिवार रोजी होणाऱ्या प्रभाग क्रमांक ८ ब मधील होत असलेल्या निवडणुकी करीता महाविकास आघाडीतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाचे अधिकृत उमेदवार सागरकुमार चौधरी यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व शाखा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी,महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज दि.१८डिसेंबर २५ रोजी दुपारी ४ वाजता यावल नगर पालीकेच्या प्रभाग क्रमांक ८ ब मधील आपले महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सागरकुमार सुनीलकुमार चौधरी यांच्या ८ ब प्रभागात प्रचंड महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून सदर रॅलीत महाविकास आघाडीचे मार्गदर्शक हाजी शब्बीर खान,सौ ललिता अनिल चौधरी,सौ छाया अतुल पाटील,अतुल वसंत पाटील यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली आयोजित करण्यात आली आहे.सदरची रॅली सागरकुमार चौधरी यांच्या निवडणूक कार्यालया पासून निघणार आहे तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.सदरहू शरद कोळी(तालुका प्रमुख,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) जगदीश कवडीवाले (शहर प्रमुख,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)यावल,हाजी हकीम शेख (शहराध्यक्ष,काँग्रेस)यावल,अन्सार खान(शहराध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार)यावल तसेच सर्व महाविकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.