Just another WordPress site

यावल पालिकेला येत्या तिन महीन्यात शहराच्या विकासासाठी निधी मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ डिसेंबर २५ बुधवार

यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच उमेदवारी मिळवुन विजयी झालेले नुतन नगरसेवक हे मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांच्या भेटी प्रसंगी विजयी झालेल्या सर्व नगरसेवकांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व शहराच्या विकासाची कामे करावी आम्ही आपल्या सोबत आहोत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.यावल नगरपालीकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथम निवडणुकी लढणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या यशाने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान आज मुंबई येथे यावलच्या नगरपालीका निवडणुकीत विजयी झालेले अंजुमबी कदीर खान,वर्षा आकाश चोपडे व आमेनाबी शाकीर खान यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्ष प्रमुख ना.अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.याप्रसंगी ना.पवार यांनी विजयी झालेल्या नगरसेवकांचे स्वागत सत्कार केले.यावल शहराच्या विकासासाठी येत्या तिन महीन्यात आपण भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगुन पक्ष संघटन वाढीसाठी जोमाने कामाने लागावे असे सांगून त्यांनी यावल नगरपालीकेचे नुतन नगरसेवकांना आश्वासीत केले व नगरपालीका निवडणुकी प्रमाणेच येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या निवडणुकी साठी देखील प्रयत्न करावीत अशा सुचनाही यावेळी उपस्थित पक्षाचे राज्य सरचिटणीस रवीन्द्र नाना पाटील,महीला आघाडीच्या प्रतिभा शिंदे,युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आकाश चोपडे,यावल शहर अध्यक्ष कदीर खान,भगतसिंग पाटील यांच्यासह आदी पक्षाचे पदाधिकारी यांना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.