यावल येथील सरस्वती विद्यामंदीर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा जुन्या आठवणींना उजाळा देणारा स्नेहमेळावा संपन्न !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ जानेवारी २६ शुक्रवार
येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा २० वर्षानंतर स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणावर उत्साहाच्या वातावरणात नुकताच संपन्न झाला,.यावेळी विद्यार्थी काळातील आपल्या जुन्या शाळकरी मित्र मैत्रिणींच्या आठवणींना उजळ देतांना अनेकांच्या डोळयात आनंदाचे अश्रु निघाले.येथील सरस्वती विद्या मंदीर या शाळेत २००५ या वर्षातील इ .१० चे ५७ व १५ माजी विद्यार्थीनी यांचा २० वर्षानंतर स्नेहमेळावा मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
शाळेच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या या स्नेहमेळाव्याची सुरुवात ही दिपप्रज्वलवाने करण्यात आली.यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आपले शिक्षणपुर्ण झाल्यावर देशसेवेसाठी विविध क्षेत्रात नौकरीला लागलेले या विद्यार्थी व विद्यार्थीनीचे देखील स्वागत करण्यात आले.दरम्यान स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने २० वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी शाळकरी भेटीत जुन्या आठवणींना मैत्रीचे बंध व शाळेतील दिवसाचे भाव पुन्हा जागृत झाले व उजाळा मिळाला व आपल्या धावपळीच्या जिवनातुन माजी विद्यार्थ्यांना थोडा विरंगुळा मिळाल्याची भावना दिसून आली.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र मिळून सामाजीक बांधीलकी च्या माध्यमातुन यावल येथील वृद्ध आश्रमात अन्नदान वितरीत केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष अरूण कुलकर्णी हे होते.संपूर्ण स्नेहमेळाव्यास यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी रितेश पाटील,हेमंत चौधरी,दुर्गादास चौधरी,राहुल बारी,योगेश यावलकर,इलियास पटेल,सचिन गौरव,समाधान बारी,कन्हैया वाणी व माजी विद्यार्थीनी मनिषा माळी,रूपाली भोईटे,पुनम सोनवणे यांच्यासह शाळेतील माजी विद्यार्थ्यानी परिश्रमाने यशस्वी झाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी विद्यार्थी इलीयास पटेल यांनी केले.