Just another WordPress site

कोरपावली ग्रामपंचायत प्रशासकांना ठेकेदाराकडून जातीवाचक शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ जुलै २६ शनिवार

ठेकेदार व ग्रामपंचायतचे माजी सरपंच व प्रशासक यांच्यात वादातुन ठेकेदाराने सरपंच यांच्याशी जाती वाचक शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची दिली असून धमकी देणाऱ्या ठेकेदाराविरूध्द यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,फिर्यादी माजी सरपंच व प्रशासक कोरपावली विलास नारायण अडकमोल वय ३६ वर्ष धंदा-शेती,राहणार कोरपावली तालुका यावल जात बौद्ध यांनी आरोपी प्रविण विठ्ठल सुर्यवंशी वय ३३ वर्ष राहणार कोळवद विरासनगर तालुका यावल जात हिंदू कोळी यांच्याविरूद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,संशयीत आरोपी प्रविण विठ्ठल सुर्यवंशी हा शासकीय विकास कामांचे ठेके घेतो मिळलेली माहिती अशी की,यावल टाऊन मधील कृष्णानगर भागातील आरोपीच्या ऑफिस बाहेर सार्वजनिक ठिकाणी थोडक्यात फिर्यादी दि.२३ जुलै रोजी दूपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या २ मित्रांसह कोरपावली तालुका यावल येथील ग्रामपंचायतीच्या कामांच्या ई-टेंडर फाईल संदर्भात आरोपीच्या ऑफिसमध्ये गेले होते.त्यावेळी संशयीत आरोपी प्रविण विठ्ठल सुर्यवंशी याने फिर्यादी माजी सरपंच व प्रशासक ग्रामपंचायत कोरपावली तालुका यावल विलास नारायण अडकमोल यांना सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली आणि विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली.सदरहू फिर्यादी यांने या भीतीमुळे आरोपी विरूध्द फिर्यादी विलास अडकमोल यांनी लगेच तक्रार दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.मात्र नंतर आरोपीने फिर्यादी विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला अर्धवट गुन्हा दाखल केला हे समजल्यावर फिर्यादीने दि.२४ जुलै रोजी पोलीस ठाण्यात येऊन प्रविण सुर्यवंशी यांच्या विरूद्ध तक्रार दिली असून पुढील तपास अनिल बडगुजर,उप विभागीय पोलीस अधिकारी फैजपुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.