Just another WordPress site

आदिवासी कार्यालयात गृहपालांना धमकी व शासकीय कामात अळथडा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ जुलै २६ शनिवार

येथील आदिवासी विकास विभाग वस्तीगृहाचे गृहपाल आणि प्रकल्प अधिकारी वस्तीगृह यांना दोन जणांनी कॉलर पकडून शिवीगाळ करीत “तु नोकरी कशी करतो” अशी धमकी देत धक्काबुक्की केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय यावल-चोपडा रोड यावल या ठिकाणी दि.२३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता आणी दि.२४ जुलै रोजी दुपारी ३ ते ३,३० वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी साहील संजय तडवी व रोहन साहील तडवी या दोघ संशयीत आरोपींनी फिर्यादी जावेद तडवी यांचा रस्ता अडवून कॉलर पकडून शिवीगाळ करून दमदाटी केली व आम्हाला वस्तीगृहाचे कॉन्ट्रॅक्ट देत नाही तसेच इथे नोकरी कशी करतो असे म्हणून नंतर आदिवासी कार्यालयात येऊन सर्व कर्मचाऱ्यांसमोर मोठमोठ्याने आरडा ओरडा करून शांतता भंग केली.”सर्व काम बंद करा बाहेर निघून जा” असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.सदरहू फिर्यादीचा शोध घेत साक्षीदार राकेश अहीरे याला शिवीगाळ करून गळा पकडून बाहेर ओढले व कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसमोर अश्लील हावभाव करून त्यांना लज्जा वाटेल असे वर्तन केले.दरम्यान सदर आरोपी दारू पिऊन त्रास देतात आणि जीवाला धोका आहे म्हणून वरिष्ठांना कळवून दि.२४ जुलै रोजी तक्रार देण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.