यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ ऑगस्ट २६ मंगळवार
तालुक्यातील किनगाव येथे दि.९ ऑगस्ट २६ रविवार रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदीवासी पंच मंडळातर्फे आदिवासी गौरव दिवसाचे आयोजन करण्यासंदर्भात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले.सदरील बैठकीत परिसरातील आदिवासी बांधवांनी हिरीरीने सहभाग नोंदवून आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्याचे ठरविण्यात आले.
दरम्यान आदिवासी पंच मंडळ हे भिल-तडवी व भिल्ल-बारेला या आदीवासी समाजामार्फत चालवले जात असून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन किनगाव येथे ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.परिणामी किनगाव येथे जागतीक आदिवासी दिवस व क्रांति दिवस आदिवासी पंच मंडळ भिल्ल तडवी भिल्ल व बरेला कमेटी किनगाव यांच्या मार्फत मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.सदर बैठकीत आदिवासी गौरव दिनानिमित्ताने दि.९ ऑगस्ट रविवार रोजी परिसरातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आदिवासी पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले.यावेळी पंच अध्यक्ष अशोक मंगल भिल्ल,अजहर छब्बू तडवी,शरीफ शिराज,खलील शिराज,विकास कालू बरेला,रूधु सुपड़ु भिल,गणेश रमेश भील,रफीक रशीद तडवी,समीर गुलशेर तडवी,सबदर छबू तडवी,दीपक जना बारेला,विकास पीताराम बारेला,आनंद पंडित भील,लतीब इलाईत तडवी,अनीस न्याजूदीन तडवी,बबलू शिराज तडवी,अनिल सतीश बारेला,भरत रामसिंग बरेला,दीपक केरा बरेला,प्रकाश पूंज्या बरेला,राकेश बंसी बरेला,धनराज बापू भील,चूडामन भील,उसेन दगा तडवी यांच्यासह समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.