Just another WordPress site

भारतीय जनता पक्षाच्या पुर्व क्षेत्राच्या अनुसुचित जमाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सतिष कोळी यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०६ ऑगस्ट २६ गुरुवार

भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा पुर्व क्षेत्राच्या अनुसुचित जमाती मोर्चाच्या जिल्हा कार्यकारणीची निवड नुकतीच करण्यात आली असून उपाध्यक्षपदी सतिष रामा कोळी यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पुर्व चे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना देवेन्द्र फडणवीस,भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविन्द्र चव्हाण यांच्या आदेशाने व भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ देवराज होळी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या अनुसुचित जमाती मोर्चाची जळगाव जिल्हा पुर्व क्षेत्राची जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष हरिलाल रमेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली असून यात जळगाव जिल्हा पुर्वच्या उपाध्यक्षपदी यावल येथील सतिष रामा कोळी यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन,स्त्रउद्योगमंत्री ना.संजय सावकारे,रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे,आमदार राजु मामा भोळे,आमदार नंदुभाऊ महाजन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडीचे स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.