Just another WordPress site

आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी कर्टुले विक्रीला खवय्यांचा यावल शहरात मोठा प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७ ऑगस्ट २६ शुक्रवार

मानवी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असणारे व पावसाळयात मिळणारी पोष्टीक आणि औषधी रानभाजी कर्टूले हे आता बाजारात विक्रीला दाखल झाले असून कर्टूले महागड्या भावात जरी विकण्यात येत असले तरी खवय्यांचा त्यांना खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

यावल शहरातील बसस्थानका समोरील परिसरात कर्टूले विक्रीला येत असुन कर्टुल्याच्या भाजी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याची आहे.यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते,शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवुन उर्जा देते,उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते,याशिवाय आपल्या डोळयांचे आरोग्यसाठी व्हिटामीन ए मुळे दृष्टी सूधारण्यास मदत होते.तसेच फायदे हृदयरोग व कोलेस्ट्रॉल हृदयरोग असणाऱ्यांसाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर असुन मधुमेह,ब्लड शुगर कंट्रोल करायला मदत होते,अस्थमा व दमा असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.हाय ब्लड प्रेशर रक्तदाब नियंत्रणात ठेवते,वात-पित्तवात आणि पित्त दोष संतुलित ठेवते,इम्यूनिटी रोग प्रतिकारक शक्ती वाढवते,त्वचेच्या समस्या दूर करायला मदत करते.थोडक्यात पावसाळ्यात मिळणारी ही रानभाजी आरोग्यासाठी खूपच बहूगुणी व गुणकारी असुन यावल शहरात कर्टूले विक्रीला खव्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.