यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील शहराच्या प्रमुख मार्गावरून जाणाऱ्या बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर या राज्य मार्गावर यावल ते किनगाव या दरम्यानच्या रस्त्याची ठिकठीकाणी पडलेल्या खड्डयामुळे अत्यंत बिकट अवस्था झालेली असून सदरील महामार्गाची तात्काळ दुर्दशा थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी केली आहे.
याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना प्रा.मुकेश येवले यांनी म्हटले आहे की,यावल शहराशी जोडला गेलेला बु्ऱ्हाणपुर ते अंकलेश्वर हा दोन प्रमुख राज्यांना जोडणारा मार्ग असुन या महामार्गावर मोठया प्रमाणावर वाहनांची वर्दळ दिसुन येत असते अशा परिस्थितीत यावल ते किनगाव पर्यंतच्या सुमारे १४ किलोमिटर रस्त्याची ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने फारच दयनीय अवस्था झालेली असून या मार्गावर लहान मोठे भिषण अपघात होवुन अनेक निरपराध वाहनचालकांना व नागरीकांना आपले प्राण गमावले आहे.अशा या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष न देणे हे नागरीकांचे दुदैव म्हणावे लागेल अशी खंत त्यांनी व्यक्त केली.तर मागील अनेक दिवसापासुन या रस्त्याच्या दुरूस्ती करीता वाहनधारक,विविध सामाजीक संस्था व सर्वसामान्य नागरीक यांच्याकडून वारंवार मागणी करण्यात आलेली आहे. परंतु स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने या नागरीकांच्या जिवन मरणाशी संबंधीत विषयाकडे गांभीयाने लक्ष देत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे.तरी प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील रस्त्याची दुरूस्ती न केल्यास आपण राज्याचे विरोधी पक्षनेते ना.अजीत पवार यांना पत्राद्वारे सविस्तर माहिती देवुन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी सांगीतले आहे.