मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
मुंबई शहर हि भारताची आर्थिक राजधानी असून कधीही न झोपणारे तसेच स्वप्नांचे शहर म्हणून मुंबई शहराची ओळख आहे.मुंबई शहरात दर सेकंदाला वाढणारी लोकसंख्या व या वाढत्या लोकसंख्येचा सार्वजनिक वाहतूक साधनांवर होणारा परिणाम लक्ष्यात घेता सरकार नवनवीन वाहतूक साधन वापरण्यावर भर देत नवनवीन प्रयोग करीत आहेत.त्यामुळे सतत कामगार वर्गाचा राबता असणारे हे शहर कित्येक कोटी लोकांचे पोट भरत असून मुंबईत कामानिमित्त प्रवास करणारे कष्टकरीजणांचे आयुष्य हे लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई रेल्वेवर अवलंबुन असते.सध्या कामानिमित्त मुंबईत येऊन स्थायिक होणारी मंडळी मुंबई लोकलवरील भार वाढवत आहेत.मुंबईत सुरु झालेल्या मेट्रो रेल्वेने लोकलवरील भर काहीसा कमी झाला असला तरी अजूनही कामानिमित्त मुंबईत वाढत जाणारे लोंढे लक्षात घेता मेट्रो सेवाही अपुरी पडत असल्याने आता भारत सरकारने मुंबईसाठी २३८ वंदे भारत मेट्रो गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे अशी माहिती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रेल्वे बोर्डाच्या वतीने कळविण्यात आले आहे कि,महत्त्वाकांक्षी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-III (एमयुटीपी-III) आणि ३ ए (एमयुटीपी-३ ए ) अंतर्गत मुंबईसाठी २३८ वंदे भारत मेट्रो गाड्या खरेदी केल्या जातील परिणामी त्या महानगराच्या उपनगरीय ट्रेनची क्षमता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरेल.रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र सरकारद्वारे सदर उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.