Just another WordPress site

“शेवटी वाट पाहण्याची एक मर्यादा असते व किती वेळ थांबायचे आणि किती सहन करायचे याचीही एक मर्यादा असते,या मर्यादा तुटल्या तर कुणी कुणाचे नसते” बच्चू कडू यांचे सूचक विधान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत.अजित पवार निधी देत नव्हते म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो असा दावा शिंदे गटातील आमदारांकडून करण्यात आला होता.आता अजित पवारच सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाली आहे.शिवाय अजित पवार गट मंत्रिमंडळात सामील झाल्याने त्यांच्या गटालाही काही मंत्रीपद द्यावी लागली आहेत त्यामुळे आधीपासून मंत्रीपदाची आशा लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांची निराशा झाली आहे.यावर आता प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी आपली नाराजी व्‍यक्‍त केली आहे.सहन करण्याची एक मर्यादा असते ती मर्यादा तुटली की कुणी कुणाचे नसते अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

मंत्रीमंडळ विस्तार आणि शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीबद्दल विचारले असता बच्चू कडू म्हणाले की,माझे मत असे आहे की मी मंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला नव्हता पण एकंदरीत जी राजकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत कोण कसे अडचणीत येते हे मी सांगितले आहे.शिंदे गटातील ८ ते १० आमदार नाराज असून त्यांच्याबरोबर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत संपर्कात करत आहेत ते आमदार पुन्हा ठाकरे गटात जातील का? या प्रश्नावर बच्चू कडू यांनी सूचक विधान केले आहे.वाट पाहण्याची आणि सहन करण्याची एक मर्यादा असते ती मर्यादा तुटली की कुणी कुणाचे नसते असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.आमदार कडू म्हणाले शेवटी वाट पाहण्याची एक मर्यादा असते, किती वेळ थांबायचे आणि किती सहन करायचे याचीही एक मर्यादा असते या मर्यादा तुटल्या तर कुणी कुणाचे नसते असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.