Just another WordPress site

महाराष्ट्र सरकारचे खातेवाटप जाहीर ! अजित पवारांकडे ‘अर्थ’ खाते !!

छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१४ जुलै २३ शुक्रवार

महाराष्ट्र सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहेत तसेच छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खाते देण्यात आले आहे.दिलीप वळसे पाटील हे सहकार मंत्री झाले आहेत तर धनंजय मुंडे हे कृषी मंत्री झाले आहेत.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून मिळून आता मंत्रिमंडळात २९ मंत्री असणार आहेत.आपण जाणून घेऊ कुणाला कुठले खाते मिळाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन,नगर विकास,माहिती व तंत्रज्ञान,माहिती व जनसंपर्क,परिवहन,सामाजिक न्याय,पर्यावरण व वातावरणीय बदल,खनिजकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह,विधी व न्याय,जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,ऊर्जा,राजशिष्टाचार ही खाती असतील.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील त्याचबरोबर इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत

छगन भुजबळ-अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील-सहकार,राधाकृष्ण विखे-पाटील-महसूल,पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास,सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार-वने,सांस्कृतिक कार्य,व मत्स्य व्यवसाय,हसन मियाँलाल मुश्रीफ-वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य,चंद्रकांतदादा बच्चू पाटील-उच्च व तंत्रशिक्षण,वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य,विजयकुमार कृष्णराव गावित-आदिवासी विकास,
गिरीष दत्तात्रय महाजन-ग्राम विकास आणि पंचायत राज,पर्यटन,गुलाबराव पाटील-पाणीपुरवठा व स्वच्छता,दादाजी दगडू भुसे-सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम),संजय दुलिचंद राठोड-मृद व जलसंधारण,धनंजय पंडितराव मुंडे-कृषि,सुरेशभाऊ दगडू खाडे-कामगार,
संदीपान आसाराम भुमरे-रोजगार हमी योजना व फलोत्पादन,उदय रविंद्र सामंत-उद्योग,प्रा.तानाजी जयवंत सावंत-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,रवींद्र दत्तात्रय चव्हाण-सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),अब्दुल सत्तार-अल्पसंख्याक विकास व औकाफ,पणन,
दीपक वसंतराव केसरकर-शालेय शिक्षण व मराठी भाषा,धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम-अन्न व औषध प्रशासन,अतुल मोरेश्वर सावे -गृह निर्माण,इतर मागास व बहुजन कल्याण,शंभूराज शिवाजीराव देसाई-राज्य उत्पादन शुल्क,कु.अदिती सुनिल तटकरे-महिला व बालविकास,
संजय बाबुराव बनसोडे-क्रीडा व युवक कल्याण,बंदरे,मंगलप्रभात लोढा-कौशल्य विकास,उद्योजकता व नाविन्यता,अनिल भाईदास पाटील – मदत पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन अशा प्रकारे खातेवाटप करण्यात आले आहे.यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणकोणती खाती देण्यात आली ती पुढीलप्रमाणे आहेत.अजित पवार यांना अर्थखाते,छगन भुजबळ हे आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री,दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते,हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य,धनंजय मुंडे हे आता कृषी मंत्री असतील,धर्मराव बाबा अत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन खाते देण्यात आले आहे तर आदिती तटकरे या महिला आणि बालविकास मंत्री आहेत.अनिल भाईदास पाटील यांना मदत आणि पुनर्वनसन तसेच आपत्ती व्यवस्थापन खाते देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.