Just another WordPress site

सपोनि व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करा अन्यथा आमरण उपोषण

मीनाबाई कोळी यांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.७ सप्टेंबर २३ गुरुवार

महिलेस अरेकारे व अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा आणि जगदीश कोळंबे,सतिष भोई या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे अन्यथा अडावद पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण केले जाईल या आशयाच्या मागणीचे निवेदन मीनाबाई कोळी यांच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना नुकतेच देण्यात आले आहे.

सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा आणि दोन पोलीस कर्मचारी जगदीश कोळंबे,सतिष भोई यांनी हुकूमशाही पध्दतीने केलेल्या मनमानी कारभाराबद्दल मीनाबाई कोळी यांनी दि.१७ ऑगस्ट २३ रोजी तक्रार सादर केली होती परंतु सदर तक्रारीची चौकशी अद्यापपावेतो झालेली नसल्यामुळे अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा आणि जगदीश कोळंबे,सतिष भोई या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे अन्यथा मीनाबाई कोळी या दि.११ सप्टेंबर २३ रोजी अडावद पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर अन्नत्याग आमरण उपोषण करणार आहेत व जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या  खंबीरपणे उपोषण करतील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन मीनाबाई रामेश्वर कोळी यांच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना नुकतेच देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.