आदिवासी कोळी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० ऑक्टोबर रोजी आयोजित अन्नत्याग आंदोलनासाठी दहा हजार समाज बांधव सहभागी होणार
जिल्हा परिषद माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ ऑक्टोबर २३ रविवार
कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आदिवासी कोळी महासंघ व समस्त जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांच्या वतीने दि.१० ऑक्टोबर मंगळवार रोजी जिल्ह्यातील आदिवासी कोळी लोकांना अनुसूचित जमातीचे दाखले मिळणेसाठी सर्वच प्रांत कार्यालयांकडे हजारो प्रकरणे प्रलंबित असून हे दाखले कोळी नोंदीनुसार सुलभ पद्धतीने मिळावेत व त्यांची वेळीच वैधता व्हावी यासह इतर मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.सदरील आंदोलनामध्ये यावल तालुक्यातुन शेकडो समाज बांधव सहभाग घेणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषद माजी गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी नुकताच व्यक्त केला आहे. यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आज दि.८ ऑक्टोबर रविवार रोजी आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवाची बैठक जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आदिवासी कोळी समाजाला जोपर्यत सरसकट जात प्रमाणपत्र मिळत नाही तो लढाई चालु ठेवण्याचा निर्धार आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला.प्रसंगी अन्नत्याग उपोषणाची तयारी करणे व नियोजनबाबत बैठक घेवून चर्चा करण्यात आली.यावेळी जितेद्र सपकाळे,यंशवत पहेलवान,आत्मराम कोळी,नामदेव कोळी,राहुल तायडे,नंदुभाऊ सोनवणे यांच्यासह यावल तालुक्यातील विविध संघटनाचे प्रतिनिधी,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य व समाज बांधव यांच्या उपस्थितीत सदरील बैठक पार पडली.यावेळी जळगाव येथे होऊ घातलेल्या अन्नत्याग उपोषणासाठी संपुर्ण रावेर तालुका मोठ्या संख्येने सहभाग घेणार असल्याचे घोषित करण्यात आले तसेच या उपोषणासाठी रावेर तालुक्यातील महीला,तरुण,विवीध संस्था,संघटना पदाधिकारी,विदयार्थी यांचा सहभागासाठी आवाहन करण्यात आले.सुलभरित्या सरसकट जात प्रमाणपत्र मिळावे,जळगाव येथे जात पडताळणी समिती कायम स्वरूपी जळगाव येथे यावी इतर समाजाप्रमाणेआदिवासी कोळी समाज विकासासाठी महर्षि वाल्मीकी ऋषी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.सदरील आंदोलना सदर्भात यावल तालुक्यातुन प्रत्येक गावातुन किमान १० -१५ लोक स्वखर्चाने जाणार असुन मुलां बाळांसहित काही परिवार तसेच शाळेकरी विद्यार्थी,विद्यार्थीनी तसेच कर्मचारी वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने जाणार आहे.सदरहू हे कोळी जमातीचे शेवटचे आरपारचे आमरण उपोषण असेल.आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षानी फक्त समाजाचा वापर केला पण आता नाही ही लढाई कोण्या पक्षाची व एका संघटनेची नसुन सर्व पक्षीय संघटनेची व समाज बांधवांची आहे असे प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी यावेळी सांगितले.सदरील बैठकीचे सूत्रसंचालन प्रमोद कोळी यांनी तर सर्व उपस्थितांचे आभार खेमंचद कोळी यांनी मानले.