Just another WordPress site

नंदुरबार येथे आदिवासी महोत्सव उत्साहाच्या वातावरणात संपन्न

नंदुरबार-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ नोव्हेंबर २३ शुक्रवार

येथे महाराष्ट्राचे राज्यपाल विजय बैस यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल आयोजित आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव नंदुरबार येथे आदिवासी तडवी भिल जमातीच्या वतीने आदिवासी तडवी भिल पारंपरिक वन औषधी,खाद्य पदार्थ व हस्तकला प्रदर्शन ठेवण्यात आले.दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून या स्टालला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या.यात महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.विजयकुमार गावीत,खासदार मा.हिनाताई गावीत व जि.प.अध्यक्ष नंदुरबार सुप्रियाताई गावीत यांच्या समवेत अनेक मान्यवरांनी आदिवासी तडवी भिल समाजाच्या पारंपरिक हस्तकला स्टाॅलला भेट दिली.यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त संदीप गोलाईत,यावल प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार,धुळे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पवार,यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहा.प्रकल्प अधिकारी जावेद तडवी,नंदुरबार आदिवासी वसतीगृहाचे अधिक्षक मनोज जमशेर तडवी,यावल प्रकल्प कार्यालयाचे दस्तगीर तडवी,यावल प्रकल्प कार्यालयाचे जब्बार तडवी,जळगाव वसतीगृहाचे जुम्मा तडवी,आदिवासी तडवी भिल युवा कृती समितीचे युनुस तडवी,अशरफ तडवी,लुकमान तडवी,मुराद तडवी,आसीफ तडवी,सद्दाम तडवी,मुस्तुफा तडवी,महिला बचत गटाचे सकिना तडवी आदि मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी आदिवासी महोत्सवात आदिवासी तडवी भिल जमातीच्या वतीने पारंपारिक हस्तकलेच्या वस्तू चाटू,बळगी,ठेसणी,खलबत्ता,रिळ,बाबूंच्या टोपली,सुपडा व हस्तकला,चित्रकलेच्या विविध साहित्य व वस्तू खाद्यपदार्थात केळीचे वेफर्स आदि प्रदर्शन व विक्री करण्यात आली.सदरील महोत्सवासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल यांचे अधिकारी कर्मचारी व आदिवासी तडवी भिल युवा कृती समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.