जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आजपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात अनेक शासकीय कर्मचारी सहभागी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ डिसेंबर २३ गुरुवार
शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाच्यावतीने मिळणारी नविन पेन्शन रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागु करावी यासह विविध मागण्यासाठी राज्य पातळीवरील विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या आज दि.१४ डिसेंबर गुरुवार पासुन पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून आपला पाठिंबा जाहीर केला आहे.परिणामी सदरील संपामुळे अनेक शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने १९८२ मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांकरिता पेन्शन योजना लागु केलेली होती मात्र महाराष्ट्र शासनाने ही पेन्शन योजना बंद करीत शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करण्यात येत असुन जुनी पेन्शन योजना पुर्वरत सुरू करावी यासाठी आज दि.१४ डिसेंबर गुरुवारपासुन होणाऱ्या शासकीय कर्मचारी यांच्या बेमुदत संपात यावल तालुक्यातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहे.परिणामी तालुक्यातील विविध शासकिय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपातील सहभागामुळे नागरीकांच्या अनेक शासकीय कामांचा खोळंबा होणार असुन विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक सत्र बंद होण्यापासून विविध क्षेत्रात याचा विपरित परिणाम होणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय सेवेतील कर्मचारी नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसह विविध न्यायीक मागण्यांसाठी राज्यातील विविध शासकीय कर्मचारी या संपात सहभागी होत आहे.दरम्यान सर्व संघटनांनी पुकारलेल्या आज दि.१४ डिसेंबर पासुनच्या बेमुदत संपात यावल तालुक्यातुन महसुलचे ७ मंडळ अधिकारी,२६ तलाठी, १o महसुल सहाय्यक,६ अव्वल कारकुन,४ शिपाई अशी ८४ कर्मचारी तसेच तालुक्यातील कंत्राटी पद्धतीवर असलेले ५ ग्रामसेवक वगळ्रन तालुक्यातील एकुण ४३ ग्रामसेवक या संपात सहभागी होत आहेत.शिवाय जळगाव जिल्ह्यातील ४९आदीवासी आश्रमशाळांचे शासकीय व निमशासकीय असे एकुण ९०० शिक्षक,सार्वजनिक बांधकाम विभाग,पंचायत समिती त्याचबरोबर तालुक्यातील एकुण २४५ जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळाचे एकुण ११०० शिक्षक यांच्यासह आदी संघटनांच्या वतीने संपात सहभाग नोंदविण्यात आला आहे.