Just another WordPress site

“हिंमत असेल तर त्यांनी अमरावतीमध्ये येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवावी व मला पराभूत करून दाखवावे,”

नवनीत राणा यांचे इम्तियाज जलील यांना खुले आव्हान

जलील यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवली नाही तर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये कसे निवडून येतील ते मी बघते.इम्तियाज जलील हे असदुद्दीन ओवैसी यांचे चमचे आहेत.संभाजीनगरचे लोक यावेळी जलील यांना निवडून येऊ देणार नाहीत असा विश्वासही नवनीत राणा यांनी व्यक्त केला.माझी विचारधारा माझ्यासोबत आहे.तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले.मी एक महिला आहे.मी पदर खोचून मैदानात उभी राहिले तर तुम्हाला पराभूत करेन.मी जलील यांना घाबरणारी नाही असे देखील राणा म्हणाल्या.दरम्यान संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी देशात राहायचे असेल तर जय श्री राम म्हणावे लागेल असे विधान केले होते.त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राणा यांच्यावर टीका केली होती.आता राणा यांनीदेखील जलील यांना मला निवडणुकीत पराभूत करून दाखवा म्हणत खुले आव्हान दिले आहे त्यामुळे जलील नवनीत राणा यांना काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.