Just another WordPress site

यावल येथील डॉ.योगेश्र्वरी पाटील यांची वैद्यकीय परिक्षेत कौतुकास्पद कामगिरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-

दि.३ एप्रिल २४ बुधवार

येथील डॉ.योगेश्वरी भाग्यश्री दिनकर पाटील (क्षीरसागर) हिने नुकत्याच झालेल्या वैद्यकीय होमिओपॅथी क्षेत्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षेत कौतुकास्पद कामगिरी करीत सदरील परीक्षा उत्तीर्ण केली आहे सदरील यशाबद्दल त्यांचे शहरासह तालुक्यातुन सर्वच स्थरावरून डॉ योगेश्वरीचे कौतुक होत आहे.

डॉ.योगेश्वरी पाटील या साईबाबा पतसंस्थेचे चेअरमन भाऊराव माणिकराव पाटील व ताराबाई पाटील विरावली यांची नात असून साईबाबा संस्थेचे संचालक तथा प्रगतशील शेतकरी दिनकर पाटील व सातोद तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका भाग्यश्री पाटील यांच्या कन्या आहेत.डॉ.योगेश्वरी पाटील यांनी शिरपूर येथील के.डी.एम.जी होमिओपॅथ या महाविद्यालयातुन वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केले.त्यांना विद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक डॉ.बी.एस.पाटील,प्रा.डॉ.संजय रुद्र यांचे मार्गदर्शन लाभले.दरम्यान डॉ. योगेश्वरी पाटील यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत व सत्कार करत तिचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.