फेक नरेटिव्ह फॅक्टरीला सोशल मीडियावर आपण तेवढ्या ताकदीने उत्तर देऊ शकलो नाही किंवा डॅमेज इतके होत आहे हे लक्षात आले नाही त्यामुळे कमी फरकाने आपण देशात ७६ सीट हरलो.काही लोक डमरु वाजवत आहेत,काही लोक छाती बडवत आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो वारंवार चालत नाही.आम्ही पुन्हा येऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रात आपण डाऊन झालो आहोत पण आऊट नाही हे लक्षात घ्या.पूर्ण ताकदीने विधानसभा जिंकणार आहोत.विधानसभेत आपण जास्त जागा जिंकू आणि महापालिका निवडणूक कधीही येऊद्या कधीही महानगरपालिकेवर आपला भगवा फडकणारच असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.मुंबईत लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या चार जागा कुठून आल्या हे नीट पाहिले तर लक्षात येईल की सामान्य मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेले नाही.मुंबईत असलेल्या चार पिढ्या मुंबईकर असलेल्या उत्तर भारतीयांनी मतदान केलेले नाही त्यांना नेमके कुठून मतदान मिळाले तर लक्षात येईल की मागचे चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते,ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींना सोडले होते तसेच ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणे सोडून जनाब बाळासाहेब ठाकरे केले होते.केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी अर्थमॅटिक जिंकले आहे असे फडणवीस म्हणाले.