Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Thursday, August 13, 2026

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

“महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का?” !! हर्षवर्धन सपकाळांची देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र !!

राजकीय घडामोडी विशेषमहाराष्ट्र घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक On Mar 22, 2025 0

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२२ मार्च २५ शनिवार

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून औरंगजेबाची कबर पाडण्याच्या संदर्भात काही संघटनांनी मागणी केली होती व यातच काही दिवसांपूर्वी नागपुरात दंगलीची घटना घडली तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणही अद्याप चर्चेत आहे.या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली असून ‘महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का ?’ असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना केला आहे तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास महाराष्ट्राच्या गृहविभागाला अपयश आले असून आता महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळायला हवे अशी मोठी मागणी देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

दरम्यान महाराष्ट्राला आज पूर्णवेळ गृहमंत्री नाहीत.महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असले पाहिजेत.काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण घडले याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना पाहता आम्ही गृहमंत्र्यांना राजीनामा मागितला आहे आणि आताही मागत आहोत.आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचा एक नव्याने प्रश्न आहे.त्या प्रश्नाचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे.महाराष्ट्राचा गृहविभाग घाशिराम कोतवाल चालवत आहे का ? असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून उपस्थित होत आहे.सध्या महाराष्ट्रात घाशिराम कोतवाली कारभार गृहविभागाचा सुरु आहे” अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखाच आहे असे मी म्हटले होते याचे कारण म्हणजे ते करत असलेला कारभार आहे.आगामी काळात सद्भावना बाळगूनच समाजासाठी काम करण्याची माझी पक्षीय आणि व्यक्तिगत इच्छा आहे. औरंगजेबाचा दाखला देत मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नसून ते वक्तव्य कारभाराच्या अनुषंगाने होते.ज्या घटना सध्या राज्यात घडत आहेत त्यामागचे वास्तव अत्यंत क्रूरपणे एकापाठोपाठ एक उजेडात येत आहे.हा घटनाक्रम लक्षात घेता मी ते वक्तव्य केले होते असे स्पष्टीकरण हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

“मुस्लीम समुदायाला धमकविण्याचा किंवा जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला तर” !! अजित पवारांचा इफ्तार पार्टीत स्पष्ट इशारा !!

Next Post

“…तर हल्लेखोरांची संपत्ती जप्त करणार” !! नागपूर दंगलीप्रकरणी फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती !!

You might also like More from author
राजकीय घडामोडी विशेष

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन आहे” !!…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

बँक खाते पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर ८१ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून…

राजकीय घडामोडी विशेष

जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर !! शिंदे गटाच्या…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

अखेर रिक्षाचालकांसाठी मराठी सक्ती लांबणीवर !! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • यावल पंचायत समितीच्या दोन कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली न झाल्यास १५ ऑगस्ट पासुन उपोषण !! कोरपावली प्रशासक तथा सरपंच विलास अडकमोल
  • राज्यासह व जिल्ह्यात क्यु आर कोड जन्म-मृत्यु दाखले मिळण्यास विलंबाबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन !!
  • नगरसेविकेच्या तक्रारीची दखल घेत यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांनी नदीपात्रात कर्मचाऱ्यांकडून केली तात्काळ स्वच्छता !!
  • यावल शहरातील विस्तारित वसाहतीमध्ये रहदारीच्या मार्गावरील धोकादायक लोंबकणाऱ्या विद्युत तारांचे नियोजन करण्याची शहरवासीयांची मागणी !!
  • यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनातर्फे पर्यावरण संवर्धन रॅली !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2026 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.