यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० मे २६ शनिवार
यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटावर आज दि.३० मे शनिवार रोजी चारचाकी वाहनाने मोटरसायकल धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जख्मी झाल्याची घटनासमोर आली आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,लखन जोहरी वय वर्ष ३२ राहणार यावल हे मोटरसायकल क्रमांक एमएच १९ डी यु ६५२१ या दुचाकी वाहनाने भुसावळकडून यावलकडे येत असतांना यावल हुन भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी डंपर वाहन क्रमांक एमएच ने एमएच /१९ सिवाय ६६५१ या वाहनाने यावलकडे येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक १९ डी यु,६५२१ या दुचाकी मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात लखन अशोक जोहरी वय ३२ वर्ष राहणार यावल यांचा जागीच मृत्यु झाला आहे.तर मोटरसायकलवर सोबत असलेल्या मयताच्या वहिनी अनिता संदीपसिंग जोहरी वय ५o वर्ष या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.या संदर्भात यावल पोलीस ठाण्याच्या पथकाच्या माध्यमातून अपघातास्थळी पंचनामा करण्यात आला असून पोलीस ठाण्यात सदर डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.