दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब तरडगाव ता फलटण येथे होईल व येथे वारीतील पहिले उभे रिंगण होईल.मुक्काम तरडगाव ता.फलटण येथे होणार आहे.दि.९ जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून पालखीचे प्रस्थान होईल त्यानंतर सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज,दुपारचे भोजन निंभोरे ओढा आणि विसावा वडजल ता फलटण येथे राहील त्यानंतर रात्रीचा मुक्काम फलटण येथे राहणार आहे.दि.१० जुलै रोजी सकाळी फलटण येथून पालखीचे प्रस्थान होईल.सकाळचा विसावा विडणी,दुपारचे भोजन पिंपरद,विसावा निंबळक फाटा येथे असेल तर रात्रीचा मुक्काम बरड येथे असणार आहे.दि.११ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशासाठी बरड येथून पालखीचे प्रस्थान होईल त्यानंतर सकाळचा विसावा साधबुवाचा ओढा तर दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ होईल त्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.सोलापूरमधील रात्रीचा मुक्काम हा माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे राहणार आहे.