Just another WordPress site

यावल येथील श्री व्यास मंदिर जुन्या स्थळाचे नुतनीकरणास शिवसेना शिंदे गटाचा विरोध

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१ सप्टेंबर २४ रविवार

येथील खान्देश वासियांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री व्यासमुनींच्या नुतनीकरणासाठी शासनाच्या वतीने निधी प्राप्त झाला असुन मंदीराच्या कामास नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.सदरील काम करीत असतांना मंदीराच्या जुन्या गाभाऱ्यास पाडण्यास शिवसेना (शिंदे) गटाने आपला विरोध केला असुन सदर काम थांबविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना नुकतेच देण्यात आले आहे.

या संदर्भात शिवसेना (शिंदे) गटाचे शहराध्यक्ष पंकज बारी यांनी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,शहरात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तपस्वी श्री व्यासमुनींचे प्रसिद्ध मंदीर असुन या मंदीराच्या नुतनीकरणाच्या कामासाठी राज्य शासनाकडून चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.सदरहू मंदीर नुतनीकरणाच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.सदर मंदिराच्या नुतनीकरणाचे काम करण्यासाठी ज्या ठीकाणी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तपस्वी ऋषिमुनी श्री व्यास यांनी मुळ ज्या स्थळी जप तप करून मंदीराची स्थापना केली आहे.दरम्यान सदरच्या मंदिराचे नुतनीकरण व्हावे अशी सर्वांची ईच्छा आहे परंतु सदरचे नुतनीकरण करण्यासाठी शेकडो वर्ष जुने मंदीर पाडण्यास शिवसेना (शिंदे) गटाने आपला विरोध दर्शविला आहे.सदर मंदीरास पाडल्यास लाखो भावी भक्तांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता लक्षात घेवुन जुन्या मंदिराची मुळ जागा न पाडता मंदिराचे नुतनीकरण व्हावे अशी मागणी शिवसेना (शिंदे) गटाचे शहराध्यक्ष पंकज बारी,सागर सपकाळे,राजु सपकाळे,राजु बारी आदींनी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.