Just another WordPress site

यावल साठवण तलाव ओव्हरफ्लोमुळे होणारी हानी शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली !!

नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नितिन सोनार यांची जिल्हाधिकारीकडे तक्रार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ सप्टेंबर २४ बुधवार

शहरातील नगरपरिषदच्या माध्यमातुन पाणी पुरवठा करणारा साठवण तलाव फुटता फुटता राहिला असून मागील दहा ते बारा दिवसापूर्वी यावल शहरातील साठवण तलाव हा ओव्हरफ्लो होऊन त्या तलावाचे पाणी ओसंडून वाहुन बाजूच्या पाठचारीतून वाहू लागल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात आले परिणामी शेतकऱ्यांनी तात्काळ गावातील लोकांशी संपर्क साधून त्या तलावा संदर्भात गावातील प्रतिष्ठित लोकांना कळवले व त्यामुळे साठवण तलाव परिसरातील शेतकऱ्यांचे होणारे पिकांचे नुकसान व मोठी दुर्घटना टळली आहे.दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर दुर्लक्ष करणाऱ्या नगरपरिषदचे अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा रावेर लोकसभा क्षेत्राचे उपसंघटक नितिन सोनार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा उपसंघटक नितिन श्रावण सोनार यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,यावल नगर परिषदच्या माध्यमातुन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव हा तुडूंब भरल्याने ओव्हरफ्लो होवुन वाहून जात असल्याचे त्या परिसरातील शेतकरी बांधवांच्या निर्दशनास आले असता वेळीच दक्षता घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.दरम्यान या साठवण तलाव पाण्याच्या वाढलेल्या दबावामुळे फुटला असता तर या परिसरातील शेतकऱ्यांची गुरे ढोरे व पिकांचे फार मोठे नुकसान झाले असते शिवाय या घटनेमुळे यावल शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असता.दरम्यान साठवण तलाव ओव्हरफ्लो प्रकारामुळे तलावास खराड्या पडल्याने या ठीकाणी कोणतीही अप्रीय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी या संपूर्ण प्रकरणात अशा प्रकारे बेजाबदारपणाने वागणाऱ्या संबधीत नगर परिषदच्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.