Just another WordPress site

यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात‎ विज्ञान मंडळाचे उद्घाटन‎

 यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

‎ येथील कला,वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात नुकतेच विज्ञान‎ मंडळाचे उद्घाटन यावल पंचायत‎ समितीचे पशुधन विकास अधिकारी‎ डॉ. एस. एन. बढे यांच्याहस्ते झाले.‎यावेळी सरस्वती माता प्रतिमेचे‎ पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या‎ प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे होत्या.‎या कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. ए. पी.‎ पाटील,विद्यार्थी विकास अधिकारी‎ डॉ. एस. पी. कापडे, डॉ. पी. व्ही.‎पावरा,प्रा. मयूर सोनवणे आदी‎ उपस्थित होते.प्रारंभी विज्ञान‎ मंडळाचे चेअरमन प्रा. एम. डी.‎ खैरनार यांनी प्रास्ताविकात विज्ञान‎ मंडळाची भूमिका विशद केली.‎यावेळी उद्घाटक डॉ. बढे यांनी विज्ञानवादी‎ विद्यार्थी हा चिकित्सक व तर्कज्ञानी‎ असतो तसेच जिद्द व चिकाटीने‎ विद्यार्थ्याला यश सहज गाठता येते.‎ध्येयवादी विद्यार्थी कधीही अपयशी‎ होत नाही असे भाषणात नमूद‎ केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्या‎ डॉ. संध्या सोनवणे यांनी समस्या ही‎ संशोधनाची जननी आहे.‎विज्ञानातील संशोधनामुळे‎ विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती‎ जोपासली जाते.विज्ञान‎ विभागातील विद्यार्थ्यांनी जिज्ञासू‎ वृत्ती बाळगली पाहिजे असे‎ प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन डॉ. आर. डी. पवार‎ यांनी केले.तर आभार डॉ.एच.जी.‎ भंगाळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी‎ विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎

Leave A Reply

Your email address will not be published.