जळगाव – पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- येथील जिल्हा कारागृहात नाश्त्याच्या कारणावरून चार कैद्यांमध्ये वाद झाला व त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले याप्रकरणी चौघे कैद्यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , जिल्हा कारागृहात दि.२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमाराला कैद्यांना सर्कल परिसरात मोकळे सोडण्यात आलेले असतांना नाश्ता वाटपप्रसंगी कैदी करण पवार ह्याने कैदी सतीश गायकवाड यास डबल नाश्ता वाटप केला नाही म्हणून त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.यानंतर दुपारी ११ वाजेच्या सुमाराला सतीश गायकवाड हा मुलाखत विभागातून त्याच्या ब्येरेक क्र.४ कडे जात असतांना करण युवराज पवार व त्याचे साथीदार विलास चंद्रसिंग पठाण, अर्जुन युवराज पवार यांनी सतीश गाईकवाडला थांबवून त्याच्याशी हुज्जत घातली व त्यांच्यात वाद झाला व लागलीच त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले.सदरील प्रकार वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील,तुरुंग अधिकारी राकेश देवरे,पोलीस शिपाई गजानन चव्हाण व इतर बंद्यांच्या लक्षात येताच त्यांनी सदरील भांडण सोडविले.
या तुंबळ हाणामारीत कैदी करण पवार ह्याच्या डाव्या पायाला व डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे व कैदी सतीश गायकवाड याच्या तोंडाला मुका मार लागला आहे.याप्रकरणी तुरुंग अधिकारी राकेश देवरे यांनी जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून कैदी करण युवराज पवार, विलास चंद्रसिंग पठाण, अर्जुन युवराज पवार व सतीश गायकवाडया हाणामारी करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.