यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ मे २६ बुधवार
शहरातील वस्तीतील आसाराम नगर परिसरात आमदार निधीतुन बांधण्यात आलेल्या गटारीच्या सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने या घाणीच्या सांडपाण्यामुळे नागरीकांना डासांचा त्रास सोसावा लागत असून नागरवासियांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.सदरहू नगर पालिका प्रशासनाने तात्काळ सांडपाण्याचा निचरा व्हावे याकरीता उपाय योजना करावी अशी मागणीची तक्रार आसाराम नगर वासीयांनी नगराध्यक्ष छाया पाटील यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

यावल शहरातील आसाराम नगरवासीयांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,यावल शहरातील गट क्रमांक ७०८ मधील प्लाट क्रमांक ३६ ते ४७ या ठिकाणी माजी आमदार कै.हरिभाऊ जावळे यांच्या निधीतुन मागील २५ वर्षापासुन प्रलंबीत गटारीचे बांधकाम २०१९ ते २०२० मध्ये मंजुर झालेले काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात आले आहे.सदरील बांधलेल्या गटारीला नैसर्गीक प्रवाहानुसार बांधून पूर्ण केलेले असुन तथापी गटारीतील सांडपाणीचा विसर्ग पुढे होत नसल्याने गटारीचे पाणी तुंबत असून सांडपाण्यास पुढे जाण्यास मार्ग नसल्याने या ठीकाणी साठवणुक होत असलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांना दुर्गधीयुक्त घाणीच्या साम्राज्यात राहावे लागत आहे.सदरहू याठिकाणी घाणीच्या साम्राज्यासह डासांचा मोठा त्रास नागरवासियांना सोसावा लागत आहे.तरी नगर पालीका प्रशासनाने तात्काळ या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी याठिकाणी प्रवाह असलेल्या गटारीला सदर गटार जोडून हा प्रश्न कायमचा सोडवावा अशी मागणी नागरवासियांनी नागराध्यक्षांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान नगरपालिका प्रशासनाने या नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नाकडे लक्ष न दिल्याने समस्त आसाराम नगरातील नागरीकांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सदरील निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.सदरील निवेदनावर प्रा.नंदन वळीकर,मुकुंदा पाटील,दिनकर फालक,विलास पाटील,विक्रम राजपुत,धनराज फालक,राजेंद्र फालक,नरेंद्र फालक,डॉ प्रवीण पाटील,डॉ दिपक चौधरी,अमरसिंग राजपूत,विनय राजपुत,आशा विलास पाटील,वंदना दिनकर फालक,नलीनी नंदन वळीकर,उषा मुकुंदा पाटील,निता नरेंद्र फालक,सिमा प्रविण पाटील आणि शांताबाई अमरसिंग राजपुत यांच्या स्वाक्षरी आहेत.