Just another WordPress site

दहिगाव येथील एमएसएफ जवानाचा चंद्रपुरच्या तलावात बुडून दुदैवी मृत्यु !! आठवडयात दुसऱ्या तरूणाचा मृत्यु झाल्याने गावात शोककळा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२७ मे २६ बुधवार

तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील रहिवाशी एमएसएफ जवान विजय काळे याचा चंद्रपूर येथे तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दि.२६ रोजी दुपारी घडली असून सदरील घटनेमुले दहिगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान तालुक्यातील दहिगाव येथील विजय ओंकार काळे वय ३४ हा चंद्रपूर येथे महाराष्ट्र सेक्युरिटी फौर्समध्ये कार्यरत होता.काल दि.२६ रोजी दुपारी तीन वाजेचे सुमारास तो आणि त्याचे मित्र तीन मिळून चंद्रपूर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते.यावेळी दोघे मित्र पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता त्यांना वाचवण्याकरिता विजय काळे यांनी सुद्धा पोहण्यासाठी उडी टाकली मात्र त्यात पाण्याचा अंदाज न समजल्याने विजय काळे हा तलावात बुडाला.सदरील तरुणाचा मृतदेह आज दि.२७ रोजी पहाटे पाण्यावर तरंगताना मिळून आला असून याबाबत चंद्रपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.विजय काळे याचे पश्चात आई,वडील,पत्नी व तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.या आठवड्यात दहिगावमध्ये दोन वेगवेगळया घटनांमध्ये दोन तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली असून मोठा दुःखाचा डोंगर कुटुंबांवर कोसळला आहे.विजय काळे हा गेल्या चार वर्षापासून एम एस एफ मध्ये कार्यरत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.