आरोपी हरेशभाई गुकिया (५२) व मनसुख ठासीभाई मवानी (५०) हे दोघेही गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असून त्यांच्याकडे मलबार हिल मतदारसंघाची व मुंबादेवी मतदारसंघातील मतदारांची यादी सापडली.सदरहू दोघेही मुंबईतील मतदारसंघातील नसून विनाकारण मुंबईतील मतदारांची यादी त्यांच्याकडे सापडल्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी व्ही.पी.रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला व दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.याशिवाय निवडणुकीच्या कालावधीत ठाण्यात चार गुन्हे व नऊ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे तसेच नवी मुंबईत तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय नाशिक,पुणे,नागपूर,सोलापूर,नगर,रायगड,चंद्रपूर,पालघर व हिंगोली येथे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न झाला तसेच दोन गट एकमेकांसमोर आले याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात ११ जणांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.याप्रकरणी जवळपास ४० जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.