ईव्हीएमबाबतच्या मुद्द्यावर बोलतांना राजू पाटील यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली असून ते म्हणाले,“या गोष्टी घडत असतांना मुख्यमंत्र्यांना ताप काय आला,ते दरे गावात जाऊन काय बसले.शेवटी यांना भाजपा जे सांगेल तेच करावे लागणार आहे पण ईव्हीएमच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठीही अशा गोष्टी सरू आहेत का अशी शंका येते.”२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकच जागा जिंकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या विधानसभेसाठी जोरदार तयारी केली होती यासाठी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यभर दौरेही केले होते.त्यांनी यावेळी २८८ पैकी १२८ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते पण यातील एकाही उमेदवाराला विजय मिळता आला नाही.पक्ष स्थापन झाल्यानंतर २००९ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार विजयी झाले होते त्यानंतर झालेल्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत प्रत्येकी एक आमदार विजयी झाला होता मात्र यंदाच्या निवडणुकीत मनसेचे पाटी कोरीच राहिली आहे.