या साप्ताहाअंतर्गत राज्यभरात व्यसनविरोधी युवा निर्धार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून व्यसनमुक्त व्यक्तीच्या हस्ते दारूच्या बाटलीला जोडे मारून मेळाव्याचे उद्घाटन केले जाणार आहे.या मेळाव्यामध्ये तरुणांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.व्यसनमुक्ती दूताचे प्रशिक्षण घेतलेले युवक युवती पुढील आठवड्यामध्ये समाजात व्यसनाच्या विरोधी पोस्टर प्रदर्शन,व्यसनविरोधी फिल्म शाळा कॉलेजमध्ये दाखवणे,गावामध्ये व्यसनविरोधी फेरीचे आयोजन करणे,शाळा कॉलेजमध्ये व्यसनाविषयी भाषण देणे,दारूच्या बाटलीला जोडे मारा आंदोलन,व्यसनविरोधी प्रतिज्ञा असलेल्या फ्लेक्सवर नागरिकांच्या सह्या घेणे तसेच समाज माध्यमातून व्यसन विरोधी संदेश प्रसारित करणे असे कार्यक्रम ठिकठिकाणी करणार आहेत अशी देखील माहिती देण्यात आली आहे.३१ डिसेंबरला लोकांनी दारू प्यावी म्हणून दारू दुकाने उशिरापर्यंत चालू ठेवण्याची परवानगी शासन देते हे व्यसनाला प्रोत्साहन देणारे धोरण शासनाने थांबवावे म्हणून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात नमूद केलेले आहे.३१ डिसेंबरला ‘दारू नको दूध प्या’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमामध्ये नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगून दारू ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.