Just another WordPress site

अखेर मुसक्या आवळल्या !! स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२८ फेब्रुवारी २५ शुक्रवार

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कारची घटना घडली होती व या आरोपीचा शोध १३ पथकांच्या माध्यमांतून घेतला जात होता पण अखेर या आरोपीला गुणाट या गावातून पोलिसांनी अटक केली आहे.मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनाकडून स्वारगेट एसटी स्थानकात आंदोलन केली.या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी १३ ठिकाणी पथक रवाना केली होती तसेच आरोपीचा तांत्रिकदृष्ट्या विश्लेषणाद्वारे देखील शोधा घेतला जात होता तर आरोपीने मागील दिवसात ज्या ज्या व्यक्तीना फोन केले होते त्या सर्व व्यक्तींकडे पोलिसांमार्फत चौकशी केली जात होती.

दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शोधून देणार्‍या नागरिकाला पुणे पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते तर आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुर तालुक्यातील गुणाट या गावातील आहे व त्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या गावामध्ये पुणे पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमांतून दिवसभर आरोपीचा शोध घेतला.आरोपी दत्तात्रय गाडे हा गुणाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्यास आला होता.मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर सरेंडर व्हायचे असल्याचे सांगून आरोपी हा नातेवाईकांच्या घरापासून निघून गेला.मात्र अनेक अडथळ्यांचा सामना पोलिसांना करावा लागला अखेर रात्रीच्या सुमारास गुणाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपींला पोलिसांनी अटक केली असून लष्कर पोलिस स्टेशन येत आणण्यात आले आहे.या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून आज दुपारी १२  वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी कळवले आहे.

मध्यरात्रीची शोधमोहीम,ड्रोनची नजर आणि डॉग स्क्वॉडने काढला माग !! ‘असा’ सापडला आरोपी दत्तात्रय गाडे !!

pune rape case accused dattatray gade arrested

बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.घटनास्थळी उभी असलेली ही बस पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून तिथून हलवण्यात आली.या बसमधील साहित्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली.सदर तरुणीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार चालू असून तिचा जबाबही घेण्यात आला. बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले यात आरोपी दत्तात्रय गाडे तरुणीला बसमध्ये नेत असल्याचे तसेच घटनेनंतर बसमधून खाली उतरून निघून जात असल्याचे दिसून आले.आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून बसस्थानकांमध्ये चोऱ्या, पाकिटमारी आणि तत्सम गुन्हे करण्यात याआधीही तो पोलिसांच्या रडारवर आला होता अशी माहिती समोर आली.पीडित तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी १३ पथक तैनात केली.त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले.

मोबाईल लोकेशनचा शोध.. !!

आरोपीची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरी चौकशी करण्यात आली मात्र तो घरी नसल्याचे दिसून आले.त्याच्या मोबाईल लोकेशनचा तपास सुरू करण्यात आला. आरोपीने गेल्या काही दिवसांनी फोन केलेल्या व्यक्तींकडेही चौकशी केली जात होती.पोलिसांना गुरुवारी सूत्रांकडून आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूरमधील त्याच्या गुणाट या गावी लपल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांची १० पथकं दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी गुणाट गावात दाखल झाली गुरुवारी दिवसभर पोलीस दत्तात्रय गाडेचा शोध घेत होते.रात्रीच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावात एका नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी येऊन गेल्याची माहिती संबंधित गावकऱ्यानी पोलिसांना फोन करून दिली.यावेळी गाडेने आपल्याला शरण जायचे असल्याचेही सांगितले.तिथून गाडे गावातल्याच एका उसाच्या शेतात जाऊन लपल्याचे पोलिसांना समजले त्यावेळी पलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने दत्तात्रय गाडेला शोधण्यास सुरुवात केली.मध्यरात्रीनंतरही पोलिसांचा ड्रोन संबंधित उसाच्या शेतावर फिरून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेतांना दिसत होता.

..अखेर दत्तात्रय गाडेला अटक झाली !!

“ड्रोनने तुझ्यावर लक्ष ठेवले आहे तू ताबडतोब जिथे आहेस तिथून बाहेर येऊन पोलिसांना शरण ये.पोलीस तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत” अशी घोषणा पोलिसांकडून सातत्याने ड्रोनच्या माध्यमातून केली जात होती.अखेर दत्तात्रय गाडे कुठे लपून बसलाय हे पोलिसांना समजले.पोलिसांनी दत्तात्रय गाडेशी ड्रोनच्या माध्यमातून संवाद साधला.आपण तिथे पोहोचत असल्याचे त्याला सांगितले तसेच “तू घाबरू नकोस”, असा दिलासाही पोलीस त्याला देत होते.आपण बोलल्यानंतर गाडे कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर येऊन उभा राहिल्याचेही शोध घेणाऱ्या एका पोलिसाने नमूद केले.डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू केला.अखेर कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर आलेला दत्तात्रय गाडे पोलिसांच्या हाती लागला.पोलिसांनी तातडीने त्याच्या मुसक्या आवळल्या आणि मध्यरात्रीच लष्कर पोलीस स्थानकात त्याला ताब्यात घेण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.