Just another WordPress site

आदिवासी विभाग शासकीय सेवेतील गोंधळाच्या चौकशी दरम्यानच्या उपोषणाची लेखी आश्वासनानंतर सांगता !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ मार्च २५ बुधवार

येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाचे कार्यकर्ते साहिल तडवी व त्यांचे सहकारी पन्नालाल मावळे,रज्जाक तडवी यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर नुकतीच सांगता करण्यात आली.

दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाव्दारे आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे भोजनासाठी लागणारे साहित्य व आदि सुविधा पुरवण्यात अटीशर्तींचा गोंधळ असल्याच्या तक्रारी असुन शाळा पातळीवर होणाऱ्या निविदा प्रक्रीयेत मोठा भ्रष्ठाचार होत असल्याच्या तक्रारी आल्याने आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते साहिल तडवी यांनी दि.१७ मार्च २५ पासुन यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर या सर्व कारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते.दरम्यान प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्याशी उपोषणकर्ते यांनी संपुर्ण विषयांवर चर्चा करीत प्रशासकीय कामात अशा प्रकारचे गोंधळ खपवुन घेतले जाणार नसल्याचे सांगुन उपोषणकर्ते यांना कार्यवाही करण्याबाबतचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता करणात आली.या उपोषणात साहील तडवी यांच्यासह आदिवासी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते मासुम रहेमान तडवी,मेरम तडवी,पन्नालाल मावळे,अकबर तडवी,प्रतिक्षा पाटील यांनी आपला सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.