Just another WordPress site

किनगाव येथील इंग्लिश स्कूलमध्ये लेफ्टनंट चैतन्य पाटील यांचा सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ मार्च २५ शनिवार

तालुक्यातील किनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लोटन हरचंद पाटील व काशिनाथ हरचंद पाटील यांचे नातू मुलीचा मुलगा तसेच कवी नितीन लोटन पाटील,रणजीत पाटील व प्रफुल्ल पाटील यांचे भाचे चैतन्य गोकुळ पाटील यांची नुकतीच लेफ्टनंट इन इंडियन आर्मी ऑफिसर या पदावर नियुक्ती झाल्याने इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे त्यांच्या नुकताच सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान चैतन्य पाटील यांचे वडील गोकुळ नानू पाटील हे एन आर आय असून त्यांच्या आई मनीषा गोकुळ पाटील या गृहिणी आहेत एकंदरीतच सर्वसामान्य कुटुंबातील चैतन्य पाटील यांचे शिक्षण डिप्लोमा डिग्री मेकॅनिकल झाले व त्यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तम यश मिळवून ते देशात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तसेच ते वयाच्या अवघ्या २४ वर्षात राजस्थान जोधपुर येथे सेवेत आहेत.त्यांच्या या यशाबद्दल इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,सचिव मनीष विजयकुमार पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील,उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी काशिनाथ हरचंद पाटील,कवी नितीन लोटन पाटील,प्रफुल्ल पाटील,सुनील महाजन इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.