दहीगाव शिवारात बिबट्याने कुत्रा व बकरी लांबविली !! वन अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ मे २५ सोमवार
तालुक्यातील दहिगाव शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले असून मेंढपाळांची बकरी व कुत्रा लांबविण्याचा प्रकार नुकताच घडला असून घटनास्थळी वनविभागीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.दरम्यान झालेल्या प्रकाराने दहीगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा बिबट्याबाबत दहशत निर्माण झाली आहे.
दरम्यान जनार्दन तुकाराम महाजन यांचे शेत गट नंबर ११२ दहिगाव शिवारमध्ये यादव कुटुंब त्यांचा फळ घेऊन मुक्कामी असून प्रत्यक्षदर्शनी मेंढपाळांनी बिबट्या झाडावरून उतरतांना बघितला व त्याने लागलीच त्यांच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला लंपास केला तर काही वेळातच बाळू रमेश माळी यांचे शेतातही मेंढपाळ उतरलेले आहेत तेथून देखील एक बकरी लंपास केल्याचे प्रत्यक्ष दर्शनी बाळू माळी व मेंढपाळांकडून सांगितले जात आहे.सदर घटनेबाबत वन विभागाला कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन परिसरातील शेतकऱ्यांना खबरदारीच्या योग्य त्या सूचना दिल्या.दरम्यान बिबट्याचे ठसे सुद्धा उमटलेले आहेत मात्र ते तसे तळसाचे आहेत असे वनविभागाचे म्हणणे आहे व तडस झाडावर चढत नाही परिणामी तो बिबट्याच आहे व आम्ही प्रत्यक्षदर्शनी बघितले आहे असेही शेतमालक बाळू माळी व जनार्दन महाजन यांनी म्हटले आहे.सदरहू झालेल्या प्रकाराने दहिगाव परिसरात बिबट्याबाबत पुन्हा दहशत निर्माण झाली असून सध्या शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झालेले आहे व त्यातच वारंवार बिबट्या दिसत असल्याच्या घटना घडत असल्याने आता शेतकरी व शेतमजूर चांगलेच धास्तावले आहेत.यात डोंगरकठोरा येथे बिबट्याचे दर्शन होऊन शेतकऱ्याची आणि बिबट्याची धरपकडसारखी घटना तसेच तालुक्यातील पाडळसा शिवारातील बिबट्याचा वावर तसेच आता पुन्हा दुसऱ्यांदा दहिगाव शिवारात बिबट्याचे दर्शन यामुळे वनविभागासमोर मोठे प्रश्न उभे राहिले आहे.दरम्यान वन विभागाकडून बिबट्याच आहे का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असतांना नागरिकांच्या म्हणण्यानुसार बिबट्या हा झाडावर चढतो तर तळस झाडावर चढू शकत नाही असा ठाम विश्वास शेतकऱ्यांचा आहे व त्यामुळे आम्ही बघीतलेला प्राणी हा बिबट्याच आहे असे प्रत्यक्षदर्शी जनार्दन महाजन आणि बाळू माळी यांचे म्हणणे आहे.दरम्यान पश्चिम वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सूनिल भिलावे यांनी दहिगाव व सावखेडा सिम परिसरातील शेतकरी,शेतमजुर व नागरीकांनी सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे.