Just another WordPress site

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनतर्फे भारतीय सैन्य दलाच्या अभिनंदनाचा ठराव पारित !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ मे २५ शुक्रवार

येथील जिल्हा परिषद साने गुरुजी सभागृहात राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन जळगांव यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले.
सदर बैठकीत पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारतीय सेनेने दिलेले ऑपरेशन सिंदूर म्हणुन यशस्वीपणे उत्तर देऊन राबवल्याबद्दल भारतीय सैन्य दलाच्या  अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणुक आयोगाला येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका १९९४-२०२२ ची ओ.बी.सी.आरक्षणाच्या स्थितीनुसार घेण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयाचे देखील स्वागत करण्यात आले.सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीस प्रभाकर नारायण सोनवणे,रामदास गोंडु पाटील,नरेंद्र गेंदराज पाटील,मधूकर काटे,मनोहर गिरधर पाटील,डॉ.कमलाकर पाटील,माधुरी चंद्रशेखर अत्तरदे,प्रतिभा तुकाराम बोरोले,तुकाराम बोरोले,रवींद्र सूर्यकांत पाटील,गोपाल पाटील,नानाभाऊ पोपट महाजन,रवींद्र पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.