Just another WordPress site

डांभुर्णी विद्यालयात व केंद्रात प्रथम आल्याबद्दल कु.वैष्णवी पाटील हिचा चेअरमन डॉ.विवेक चौधरी यांच्यातर्फे सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ मे २५ शुक्रवार

माध्यमीक शालांत परीक्षा २०२५ चा इ.१० वीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात यावल तालुक्यातील उंटावद येथील ह.भ.प.महेश भगवान पाटील यांची कन्या कु.वैष्णवी महेश पाटील ही ९३.६०% गुण मिळवून डांभुर्णी येथील डाँ.दिवाकर खंडू चौधरी विद्यालय व केंन्द्रात प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाली आहे.

दरम्यान वैष्णवी पाटील हिचे वडील बाबा भगवान अभिमन पाटील हे १९७५ साली सी.ए.झालेले आहेत तर वडील ह.भ.प.महेश महाराज व काका ह.भ.प.श्रीराम महाराज हे उत्कृष किर्तनकार व कथावाचक आहेत.एकंदरीतच कु.वैष्णवीच्या परीवारात अध्यात्म व शिक्षणाचा वसा आहे.कु.वैषणवीने मिळवलेल्या यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन व जळगाव येथील गजानन हार्ट क्रिटिकल सेंटरचे संचालक डॉ.विवेक दिवाकर चौधरी,मुख्याध्यापक उमाकांत महाजन,शिक्षक दिनेश ठाकूर,जितेंद्र फिरके,विवेक महाजन,पंकज भालेराव,भूषण भिरूड,बियाणी पब्लिक स्कूल भुसावळचे प्राचार्य व वैष्णवी च फुवा डी.एम.पाटील यांनी सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेछा दिल्या आहेत.उंटावद येथील ओंकारेश्वर मंदीरात झालेल्या या सत्काराच्या कार्यक्रमाला वैष्णवीचे बाबा भगवान पाटील व बापूराव पाटील इ.सह परीवारातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.