Just another WordPress site

माती वाहतुक प्रकारणाची बातमी ग्रुपवर टाकल्याच्या कारणावरून सरपंच पतीकडून तरुणाला जीवे मारण्याची धमकी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ मे २५ रविवार

तालुक्यातील पाडळसे गावातील गौशाळा परिसरातील माती खोदकाम व वाहतुकीचा मुद्दा चिघळत चालला आहे.सदर प्रकरणात सरपंच सौ.गुणवंती सुरज पाटील यांनी कोणताही ठराव न घेता सावदा येथील व्यक्तीस माती नेण्याची परवानगी दिल्याची माहिती समोर आली होती.याबाबतची बातमी गावातील तरुण गोविंदा संजय कोळी यांनी गावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली व त्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली आहे.या बातमीमुळे चिडलेल्या सरपंच पती सुरज मनोहर पाटील यांनी गोविंदा कोळी यांना दारू पिऊन धमकावल्याचा आरोप गोविंदा कोळी यांनी केला असून त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तर दुसरीकडे सुरज पाटील यांनीही गोविंदा कोळी यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यामुळे हे प्रकरण आता परस्पर आरोप-प्रत्यारोपात अडकले आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे.काही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे याप्रकरणात निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.यात ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता नसेल,ठराव व ग्रामसभेचा अवमान केला जाईल आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमकावले जाईल तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होणारच अशी तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.सदरहू सरपंचपती सुरज पाटील नेहमी दारूच्या नशेत ग्रामपंचायतच्या कामात नेहमी हस्तक्षेप करत असतो आणि पत्नीच्या पदाचा गैरफायदा घेत आहे असे गावातील उपसरपंच अलकाबाई कोळी,ग्रा.सदस्य पुनम पाटील,तुषार भोई,सुदेश बाविस्कर,पांडुरंग कोळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.तरी पोलीस प्रशासन दोन्ही तक्रारींची चौकशी करत असून पुढील कारवाईसाठी पुरावे गोळा केले जात आहेत.गावातील नागरिकांनी संयम राखावा व कोणताही अफवा पसरवू नये असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.